Top News कोरोना देश

भारत-ब्रिटन विमान प्रवासावरील बंदीत वाढ होणार; उड्डाणमंत्र्यांचे संकेत

नवी दिल्ली | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू समोर आला. दरम्यान ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 6 प्रवाशांमध्ये कोरोनाचं हे नवा विषाणू (स्ट्रेन) आढळून आला आहे. यानंतर भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणं 31 डिसेंबरनंतरही बंद राहणार असल्याचे संकेत देण्यात आलेत.

नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या सांगण्यानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील रद्द करण्यात आलेली विमान सेवा आणखी काही दिवस रद्दच ठेवावी लागणार असल्याची शक्यता आहे.

हरदीपसिंग पुरी म्हणाले, “ब्रिटनला जाणाऱ्या विमानांच्या या तात्पुरत्या बंदीत आणखी वाढ होऊ शकते. मात्र ही बंदी अधिक काळासाठी सुरु राहिलं असं मात्र मला वाटत नाही.”

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केलाय. या नव्या विषाणूने भारतातही शिरकाव केला असून ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 6 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची, माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलीये.

थोडक्यात बातम्या-

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; भाजप आमदाराची टीका

10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी

मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या