नवी दिल्ली | कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्यानंतर ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. यानंतर अनेक देशांसोबत भारताने ब्रिटनची विमानसेवा 7 जानेवारीपर्यंत स्थगित केली होती.
तर आता भारताने 8 जानेवारीपासून भारत ते ब्रिटन सेवा सुरु करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
याबाबत आरोग्य मंत्रालयाने एसओपी जारी केलीये. या एसोपीनुसार, डीजीसीएकडून केवळ मर्यादित संख्येतच विमानांना परवानगी देणारे. विमान सेवा कंपन्यांना कोणत्याही प्रवाशाला तिसऱ्या देशाच्या ट्रान्झिट एअरपोर्टद्वारे ब्रिटनहून भारतात प्रवास करण्याला परवानगी देणार नाही याची काळजी घेतली जाईल.
दरम्यान विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या बोर्डिंगच्या वेळी प्रवाशांकडे कोरोना टेस्टचा रिपोर्ट आहे की नाही याची तपासणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात.
थोडक्यात बातम्या-
‘सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेला इशारा
रोहित शर्माची एक चूक आणि भारताचे 5 खेळाडू आयसोलेशनमध्ये
“औरंगाबादचे नामांतर महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा कायम विरोधच”
लेडी PSI ची आत्महत्या; पत्रात लिहिलं ‘हे’ कारण!