पोचेफस्टरुम | दक्षिण आफ्रिकेत सुरु असणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने पाकिस्तानी संघाचा 10 गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघ अंतिम सामन्यात काय कामगिरी करतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
उपांत्य सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत सर्ववाद 172 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी दमदार खेळी केली. जयस्वाल याने नाबाद शतकी खेळी केली तर सक्सेना याने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
जयस्वालने 113 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 105 धावांची खेळी केली. तर सक्सेनाने 99 चेंडूत 59 धावांची खेळी केली. भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानी गोलंदाजांनी पळता भूई थोडी केली.
पाकिस्तानकडून फलंदाजी करताना हैदर आणि कर्णधार रोहेल नाझीरने अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्यानंतर आलेल्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. संपूर्ण पाकिस्तानी संंघ 172 धावातच गुंडाळला.
ट्रेंडिंग बातम्या-
“सैनिकांच्या नावाने मतं मागणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघडा केला”
सबुरीने देत नसाल तर खेचून आणू- तानाजी सावंत
महत्वाच्या बातम्या-
कामाला लागा…पवार साहेबांना पंतप्रधान बनवायचंय; रोहित पवारांची साद
पंतप्रधान मोदी एक दिवस ‘ताजमहल’ही विकतील; राहुल गांधींचं टीकास्त्र
Comments are closed.