Top News देश

देशात कोरोनाचा हाहाकार, कालच्या दिवसातली धक्कादायक आकडेवारी….

नवी दिल्ली |  कोरोनाने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला आहे. आतापर्यंतच्या सर्वोच्च आकड्याची गेल्या 24 तासांत नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 57 हजारांपेक्षा कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 57 हजार 117 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 16 लाख 95 हजार 998 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 764 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 5 लाख 65 हजार 103 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 10 लाख 94 हजार 374 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

 

 

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.67 टक्के आहे. काल 10 हजार 320 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 50 हजार 662 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचा विचार चालू असतो”

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात, यादी तयार- बच्चू कडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या