खेळ

ऐतिहासिक! पुरूष कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अंपायर

सिडनी | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्यांदा एक महिला अम्पायरिंग करताना दिसणार आहे. क्लेअर पोलोसका असं या महिला अंपायरचं नाव आहे.

पोलोसका ही महिला चौथ्या अंपायरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. याआधी तिने मेन्स वन डे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून भूमिका बजावली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलियात एकूण चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत. तिसऱ्या सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन अंपायर म्हणून असणार आहे. ब्रूस ऑक्सनफोर्ड हे तिसरा अंपायर म्हणून काम पाहणार आहे. तर डेव्हिड बून मॅच रेफरी असणार आहेत. त्यानंतर चौथा मंच म्हणून क्लेअर पोलोसाक या अंपायरची जबाबदारी सांभाळणार आहे.

32 वर्षांच्या क्लेअर पोलोसाक यांनी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मेन्स क्रिकेटमधील काही सामन्यात त्यांनी अंपायर म्हणून काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदींनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजप 400चा आकडा करणार क्रॉस”

“मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव”

‘बंगाल टायगर’ सौरव गांगुलीला डिस्चार्ज; दादा म्हणाला….

…त्यामुळेच सोनू सूदवर कारवाई करण्यात आली- राम कदम

“आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये, जनतेला तुमची लायकी कळली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या