खेळ

अखेर बांगलादेशने विजयाचं खातं उघडलं!

नवी दिल्ली | भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारतावर  विजय मिळवला. भारताने दिलेले 149 धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केलं.

बांगलादेशने विजयासह भारताविरूद्ध टी20 इतिहासातील पहिला सामना जिंकला. आधीच्या 8 सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी होणार आहे. भारतीय संघातून आपला पदार्पणाचा टी 20 सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबेही केवळ एक धाव करून बाद झाला.

सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकार त्रिफळाचीत झाला. 1 चौकार आणि 2 षटकार खेचत त्याने 35 चेंडूत 39 धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी खलीलने त्याचा त्रिफळा उडवला.

मुश्फिकुर 36 चेंडूत 38 धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला होता. त्याचा फटका भारताला बसला. भारताकडून चहर, चहल आणि खलीलने 1-1 बळी टिपला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या