खेळ

…तर कालच्या सामन्यात भारत हरला नसता! पहा व्हीडिओ

नवी दिल्ली | मुश्फिकुर रहिमच्या शानदार अर्धशतकामुळे मुळे बांगलादेशनं भारताला दिल्लीत खेळण्यात आलेल्या तीन सामन्याच्या सीरिजच्या पहिल्या T20 सामन्यात 7 विकेट्सनी पराभूत केलं. अष्टपैलू क्रुणाल पांड्याने सोडलेला झेल भारतीय संघाच्या पराभवास कारणीभूत ठरवला जात आहे.

बांगलादेशची आघडीची फळी लवकर गेल्याने मुश्फिकुर रहीमने सामन्याचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेत खेळत होता. मात्र मुश्फिकुर 36 चेंडूत 38 धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला. आणि भारताच्या हातून सामना निसटला. तो झेल पकडला असता तर कदाचित भारत हरला नसता. 

चेंडू उंच उडून पांड्याच्या दिशेने गेला. पण क्रुणाल पांड्याला तो झेलणे शक्य झाले नाही. झेल सुटल्यानंतर मुश्फिकुरने तुफान फटकेबाजी करत  43 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 60 धावा केल्या. आणि बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बांगलादेशची सुरूवात काहीशी खराब झाली होती. लिटन दास 7 धावांवर तर मोहम्मद नईम 26 धावांवर माघारी परतला होता. सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकारही 38 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारत सामना जिंकणार अशी आशा चाहत्यांना होती. मात्र मुश्फिकुरने भारतीय चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरलं.

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या