बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इशान किशनचं धूमधडाक्यात पदार्पण, भारताचा इंग्लंडवर दमदार विजय

अहमदाबाद | भारत आणि इंग्लंडमध्ये चालू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यामध्ये प्रथम फलंदाजीला येत इंग्लंडच्या संघाने भारताला 165 धावांचं लक्ष्य दिलं आहे. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर के. एल. राहुल खातं न उघडता माघारी परतला. मात्र आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा इशानने स्फोटक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढलीत.

इशाने 32 चेंडूत 56 धावांची धमाकेदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेलं. इशानने आपल्या खेळीत पाच चौकार तर खणखणीत 5 षटकार ठोकले. इशान खेळत असताना वाटलं नाही की तो त्याचा पहिला सामना खेळत आहे. कोणताही दबाव न घेता तो आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करताना दिसला.

इंग्लंडने फलंदाजी करताना इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी चांगला खेळ करताना इंग्लंडला 6 बाद 164 धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं आपल्या  20 व्या षटकात अवघ्या 6 धावा दिल्या.

दरम्यान, भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला असून पाच सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहलीने नाबाद 73 धावांची खेळी केली तर पंतनेही 26 धावांची आक्रमक छोटेखानी खेळी करत विजयाचा पाया रचला.

थोडक्यात बातम्या- 

आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे संपवू- अमित शहा

“राजकारणात काहीही होऊ शकतं नाना पटोलेसुद्धा आमच्याकडे येऊ शकतात”

शरद पवारांनी केेलेल्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

आई गेली देवाघरी तर बापाने सोडलं वाऱ्यावर, बहिणीसोबत राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीने उचललं धक्कादायक पाऊल

“शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More