India vs England t20 series 2025 | भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० (T-20) मालिकेला आजपासून (२२ जानेवारी) सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या (Kolkata) ऐतिहासिक ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल. (India vs England t20 series 2025)
इंग्लंडने (England) आपला संघ एक दिवस आधीच जाहीर केला आहे, तर सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ (Indian Team) नाणेफेकीच्या (Toss) वेळी आपला संघ जाहीर करेल.
कोलकात्यातील (Kolkata) आकडेवारी आणि भारतासाठी धोक्याची घंटा
कोलकात्याच्या (Kolkata) मैदानावर भारतीय संघाचा (Indian Team) टी-२० (T-20) विक्रम जरी भक्कम असला, तरी इंग्लंडविरुद्धचा (England) इतिहास भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
भारतीय संघाने ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) आतापर्यंत एकूण ८ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. विशेष म्हणजे, या मैदानावर भारताचा एकमेव पराभव इंग्लंडविरुद्धच झाला आहे.
भारताने आपला पहिला टी-२० सामना २९ ऑक्टोबर २०११ रोजी याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळला होता आणि त्यात ६ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) १६ चेंडूत १५ धावा केल्या होत्या. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) भारतीय संघाचा कर्णधार होता, तर इंग्लंडचे नेतृत्व ग्रॅमी स्वानकडे (Graeme Swann) होते. त्यामुळे, या सामन्यात इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागेल. (India vs England t20 series 2025)
भारत-इंग्लंड टी-२० हेड टू हेड (Head to Head)
एकूण सामने: २४
भारत विजयी: १३
इंग्लंड विजयी: ११ (India vs England t20 series 2025)
भारतीय संघ संभाव्य शिलेदार
भारतीय संघ (Indian Team): सूर्यकुमार यादव (कर्णधार) (Captain), संजू सॅमसन (यष्टीरक्षक) (Wicket Keeper), अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), तिलक वर्मा (Tilak Varma), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रिंकू सिंग (Rinku Singh), नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy), अक्षर पटेल (उपकर्णधार) (Vice-Captain), हर्षित राणा (Harshit Rana), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), मोहम्मद शमी (Mohammed Shami), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), रवी बिश्नोई (Ravi Bishnoi), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) (Wicket Keeper)
Title : India vs England t20 series 2025