बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपरम‌ॅन जडेजाने घेतलेल्या या झेलपुढे सारेच झाले गार; पाहा व्हिडीओ

ख्राइस्टचर्च | भारत-न्यूझीलंड यांच्यात ख्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर रवींद्र जडेजाने उंच उडी मारत झेल घेतला. जडेजा हा जगातला सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. संघाला विकेटची गरज असताना शमीनं टाकलेल्या चेंडूवर जडेजानं हवेत उडी घेत जबरदस्त कॅच घेतला.

जडेजाच्या या कॅचमुळं नेइल वॅगनर 21 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी भारतानं जबरदस्त कमबॅक केला असला तरी, न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारताच्या नाकीनऊ आणला.

पहिल्या पहिल्या दोन सेशनमध्ये बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज टिकू शकले नाही. बुमराहने केन विल्यम्सनला 3 धावांवर माघारी धाडले. तर, रॉस टेलरही 15 धावांवर बाद झाला. मात्र कॉलिन डी-ग्रँडहोम आणि कायल जॅमिसन यांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं.

दरम्यान, न्यूझीलंडची मधली फळी अयशस्वी ठरली असली तरी, तळाच्या फलंदाजांची चांगली कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, उमेश यादवने 1 तर रवींद्र जडेजाने कायलला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

विश्वचषकातील ‘लेडी सेहवाग’ची तुफान फलंदाजी पाहून सचिन म्हणाला

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना काहीही अडचण येऊ देऊ नका- मुख्यमंत्री

महत्वाच्या बातम्या-

“नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा जन्माचा दाखला नाही”

महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका आहे- रूपाली चाकणकर

“मुस्लिमांना आरक्षण देणे ही तर उद्धव ठाकरेंची लाचारी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More