द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा मानहानीकारक पराभव, मालिकाही गमावली

सेंच्युरियन । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 135 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह 3 सामन्यांची मालिकाही भारताने गमावली. त्यामुळे परदेशी खेळपट्टीवर पुन्हा एकदा भारताची हाराकिरी पहायला मिळाली.

दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चौथ्या दिवसअखेर 3 बाद 35 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. भारतीय संघाचा अख्खा डाव आज 151 धावांत आटोपला.

दरम्यान, भारताकडून एकट्या रोहित शर्माने एक बाजू लावून धरली. त्याने 74 चेंडूत 47 धावा केल्या. मात्र त्याला दुसऱ्या बाजूनं खंबीर साथ मिळू शकली नाही.