खेळ

नववर्षाच्या सुरूवातीला भारतीय संघाने श्रीलंकेचा उडवला ‘धुरळा’; श्रीलंकेवर 78 धावांनी मात

पुणे | भारतीय संघाचा कर्णधार  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अखेरच्या सामन्यात श्रीलंकेवर 78 धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने सर्व बाद 123 धावांपर्यंत मजल मारली.

नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर भारताच्या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुलने 36 चेंडूत 54 धावा केल्या. तर शिखर धवनने 36 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यानंतर मात्र मैदानात उतरलेल्या भारतीय फलदांजाना मोठी मजल मारता आली नाही.

श्रीलंकन संघाला सुरूवातीलाच जसप्रीत बुमराहने धक्के दिले. त्यांनंतर अंतराने विकेट गेल्यानं लंकेला 123 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर लंकेच्या धनंजय डिसील्वा आणि अँजूलो मॅथूज यांना वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

दरम्यान, पुण्यात खेळवण्यात आलेल्या या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा नवीन वर्षातील  हा पहिला  मालिका विजय ठरला. भारत विरुद्ध श्रीलंका हा पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. मात्र त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात भारताने विजयी सलामी केली.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“…तर मनसेचे 20 ते 25 उमेदवार निवडून आले असते”

“चंद्रकांत पाटलांना सहकार आणि जिल्हा बँक समजायला दूसरा जन्म घ्यावा लागेल”

साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो, हे मराठवाड्याच्या मातीनं दाखवून दिलं- शरद पवार

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या