भारतापुढे विंडीज सपशेल फेल; भारतानं फॉलोऑन लादला

राजकोट | भारत विरूद्ध विंडिज कसोटी सामन्यात भारताने अवघ्या 181 धावांमध्ये विंडिजचा डाव गुंडाळला आहे. भारताने 468 धावांची आघाडी मिळाल्याने विंडिजवर फॉलोऑन लादला आहे.

आज कसोटी सामन्याचा तिसरा दिवस असून विंडिजने 6 बाद 94 धावांवर खेळ सुरु केला. मात्र भारताच्या गोलंदाजीसमोर विंडिजची फलंदाजी ढेपाळली.

अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेत मोलाचे योगदान दिले, तर मोहम्मद शमीने 2, उमेश यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. 

दरम्यान, आज कसोटीचा तिसरा दिवस असून विंडिज दुसरा डाव खेळणार आहे. परंतु भारताची आक्रमक खेळी पाहता दिवसाखेरपर्यंत भारत विंडिजला गुंडाळणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एकनाथ खडसेंना यावेळी तरी मंत्रिपद मिळणार का?

-मंत्रिमंडळातून कुणाला मिळणार डच्चू अन् कुणाचा होणार समावेश?

-बलात्कारामुळे गुजराती संतापले; परप्रांतियांवर हिंसक हल्ले सुरु

-50 हजारांचा पोपट चोरीला; व्हॉट्सअॅमुळे अवघ्या 48 तासात सापडला

-शरद पवार यांनी पुण्यातून निवडणूक लढवावी; राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या