खेळ

अखेर साहेबांना पाणी पाजण्यात कोहलीच्या संघाला यश!

नॉटींगहम | तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पाणी पाजण्यात भारताला यश आले आहे. भारताने इंग्लडवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारताचा हा पहिला विजय आहे.

मंगळवारी 311 धावांवर 9 बाद असा खेळ थांबवण्यात आला होता. आज मैदानात 6 धावांची भर घालून आर अश्विनच्या चेंडूवर जेम्स अॅंडरसन रहाणेकडे झेल देत बाद झाला आणि भारताला विजय मिळाला. 

दरम्यान, भारताच्या विजयात गोलंदाजांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराने 5, इशांत शर्माने 2 तर हार्दिक पंड्या, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्र कन्येचा ‘सुवर्ण’वेध; नेमबाजीत गोल्ड मिळवणारी पहिलीच महिला नेमबाज

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या