बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतानं इतिहास घडवला; न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय

नवी दिल्ली | न्युझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुल यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने 163 धावांपर्यंत मजल मारली होती.

भारताने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची चांगलीच दमछाक झाली. न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे न्यूझीलंडला नमवत भारताने इतिहास घडवला आहे.

2020 या वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहासात नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे.

भारतीय संघानं टी-20 सीरिज याआधीच जिंकल्यानं टीम इंडियाचा पारडं जड मानलं जातं होतं. भारताने टॉस जिंकत आधी बॅटींगचा निर्णय़ घेतला होता. विराट कोहलीला आज विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

CAAला पाठिंबा पण NRC राज्यात लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, ‘ते’ वक्तव्य आक्षेपार्हच- चित्रा वाघ

महत्वाच्या बातम्या-

मुलीच्या लग्नाचं वय 18 असावं की 21; आर्ची म्हणते…

पदवीधारकांसाठी 5 हजार, तर पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बरोजगारी भत्ता; काँग्रेसची घोषणा

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला खर्च होतात तब्बल इतके कोटी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More