ब्रेंडा (नेदरलँड) | हॉकी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अक्षरक्षः धुव्वा उडवला आहे. 4-0 ने सामना जिंकत भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.
दोन्ही संघानी सावध सुरुवात केली होती, मात्र भारताच्या रमणदीप सिंगने 25 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिलप्रीत सिंह, मनदीप सिंह आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल झळकवला.
भारताच्या आक्रमणामुळे पाकिस्तानचा संघ भेदरला होता. पाकिस्तानचा एक गोल पंचांनी अवैध ठरवला तर एका पेनल्टी कॉर्नरचाही पाकिस्तानला फायदा घेता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
-राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
-रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत!
-विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर
जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल
-पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी