बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तब्बल 21 वर्षांनी भारतानं जिंकला Miss Universeचा खिताब; ‘ही’ व्यक्ती ठरली मानकरी

नवी दिल्ली | तब्बल 21 वर्षानंतर भारतानं मिस यूनिवर्स 2021चा (Miss Universe 2021) खिताब जिंकला आहे. त्यामुळे देशात सध्या आनंदीमय वातावरण आहे. देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण जगण्याची संधी देणारी ‘मिस युनिवर्स 2021’ ठरली आहे 21 वर्षीय तरुणी हरनाज संधू (Harnaaz Kaur Sandhu).

इस्रायलमधील इलात येथे झालेल्या 70व्या ‘मिस युनिव्हर्स 2021’ (Miss Universe 2021) स्पर्धेत भारताची हरनाझ कौर संधूनं(Harnaaz Kaur Sandhu) मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. खूप वर्षानंतर हा मान भारताकडे आला असून सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे.

भारतानं यापूर्वी 2000 मध्ये हा खिताब पटकावला होता. 2000 मध्ये लारा दत्ता मिस युनिव्हर्स बनली होती. तिच्यानंतर आता 21 वर्षानंतर हा मान पुन्हा भारताला मिळाला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर  होणाऱ्या या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये तिला बर्‍याच लोकांना हवामान बदल ही फसवी वाटते, पण ही गोष्ट त्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय कराल? हा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना हरनाज म्हणाली की, “निसर्ग अनेक समस्यांमधून जात आहे हे पाहून माझे हृदय हळहळते आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे आहे. मला वाटते की हीच वेळ आहे कृती करण्याची आणि कमी बोलण्याची. कारण तुमची प्रत्येक कृती निसर्गाला वाचवू शकते किंवा नष्ट टाकू शकते. पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या चुकीमध्ये दुरुस्ती करणे जास्त चांगले आहे.”

 

थोडक्यात बातम्या – 

‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावरुन संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, भाजपचा आक्रमक पवित्रा

अभिनेत्री नोरा फतेही ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात?; ‘त्या’ व्हायरल फोटोंनी वाढवली उत्सुकता

Omicron ने धाकधूक वाढवली; ‘ही’ रूग्णसंख्या म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल?

‘मोदींना धन्यवाद देण्यासाठी शेजाऱ्यांना चहा पाजा’; रावसाहेब दानवेंनी दिला अजब सल्ला

‘त्या’ गटारगंगेतून मुंबईला बाहेर काढायचंय; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More