खेळ

पोरींनी देशाचं नाव काढलं; मारली अंतिम फेरीत धडक…

जकार्ता | इंडोनेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डीच्या संघाने अंतिम फेरीत मुसंडी मारली आहे. चीन तैपेईचा 27-14 पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

पहिल्या सत्राच्या अखेरीस 11-8 ने भारतीय महिलांनी आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात तैपईच्या खेळाडूंनी खेळात सुधारणा केली. तरीही भारतीय महिलांनी खेळावरची पकड मजबूत ठेवत 27-14 ने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. 

दरम्यान, भारताच्या पायल चौधरी, रणदीप कौर, साक्षी यांनी चढाईत उत्तम कामगिरी केली. बचावात रितू नेगीनेही आपले कौशल्य दाखवले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींच्या अस्थीकलश दर्शनावेळी भाजप मंत्र्यांचा हास्यविनोद, व्हीडिओ व्हायरल

-चाहत्याच्या आवाहनामुळे केरळवासियांना 1,00,00,000 एवढ्या रूपयांची मदत, कोण आहे हा अभिनेता?

-‘मुंगळा’ नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला, हेलनला टक्कर देणार ‘ही’ अभिनेत्री

-रिलायन्सनं दाखवलं औदार्य; केरळवासियांना केली मोठी मदत

-पुराचं पाणी ओसरतंय तोच केरळवासियांसमोर ‘हे’ भयानक संकट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या