विंडीजचं ‘घालीन लोटांगण’; भारताचा एक डाव 272 धावांनी विजय

राजकोट | भारत विरुद्ध विंडिज कसोटी सामन्यात भारताने विंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने एक डाव 272 धावांनी कसोटी जिंकली आहे.

पहिल्या डावात भारताने विंडिजसमोर 649 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र विंडिजचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही आणि पहिल्याच डावात 181 धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. 

पहिल्या डावात 472 धावांनी आघाडी घेतलेल्या भारताने विंडिजवर फॉलोऑन लादला. पुन्हा नव्याने डाव खेळायला आलेल्या विंडिजने सावध सुरुवात केली. मात्र 96 धावांवरच त्यांची गाडी पुन्हा कोलमडली आणि गडी बाद होण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी ताकद दाखवत अवघ्या 196 धावांमध्ये विंडिजच्या पुर्ण संघाला परतीचा रस्ता दाखवला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राजू शेट्टी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; ठेवला ‘हा’ महत्त्वाचा प्रस्ताव!

-गुडन्यूज! आता गाडीची कागदपत्रं सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही!

-अयोध्येतील भूमी ही बौद्ध तीर्थक्षेत्र; रामदास आठवलेंचा दावा

-भास्कर जाधवांसाठी तटकरेंची माघार; निवडून आणण्यासाठी काम करणार!

-शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार का?; राष्ट्रवादीचा मोठा खुलासा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या