गोल्डकोस्ट (ऑस्ट्रेलिया) | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केलीय. संजिता चानू हिने वेटलिफ्टींगच्या 53 किलो वजनी गटात दुसरं सुवर्ण पटकावलं.
संजिता चानूने 192 किलो वजन उचलून नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. भारतासाठी दुसरं सुवर्णपदक मिळवून संजिता चानूने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय.
भारताला याआधी मिराबाई चानू हिने 48 वजनी गटात दमदार कामगिरी करत पहिलं सुवर्ण मिळवून दिलं होतं तर गुरूराजने रौप्य मिळवून दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
- एकनाथ खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
- गिरीश बापटांना डच्चू देऊन मेधा कुलकर्णींना मंत्रिपदाची संधी?
- शिवसेनेविरोधात काँग्रेसचा डाव, शिवसैनिकालाच उमेदवारी बहाल
Comments are closed.