बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

टोकियो | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 7 पदकं पटकावली होती. त्यानंतर आता टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये देखील भारतीय खेळाडू कमाल करताना दिसत आहेत. काल भारतीय खेळाडूंनी भारताच्या खात्यात 3 पदकं टाकली. त्यानंतर आता आजचा दिवस देखील भारतासाठी महत्त्वाचा ठरला आहे. आजच्या दिवसात भारताने 4 पदकं पटकावली आहे.

नुकत्याच आलेल्या माहितीनुसार भारताच्या योगेश कठुनिया यानंही थाळीफेकीत भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं आपल्या अंतिम फेरीत दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो स्पर्धेत त्यानं हे रौप्यपदक जिंकलं आहे. तर दुसरीकडे भालाफेक स्पर्धेत भारताच्या दोन खेळाडूंनी विजय मिळवला आहे.

भालाफेक स्पर्धेत देवेंद्र झाझरिया आणि सुंदर सिंह गूर्जर यानं पदक जिंकलं आहे. देवेंद्रनं रौप्यपदक तर सुंदरनं कांस्यपदकाची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत भारताने एकूण 7 पदकं आपल्या खात्यात जमा केली आहेत. सकाळी झालेल्या स्पर्धेत भारतीय नेमबाज अवनी लेखना हीने सुवर्णरपदकाची कामगिरी केली होती.

दरम्यान, काल भारताच्या उंच उडी स्पर्धेमध्ये भारताच्या निशाद कुमार याला रौप्यपदक मिळालं. तर भारतीय टेबल टेनिसपटू भाविना पटेलने महिला एकेरीत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याचसोबत भारताच्या विनोद कुमारने कांस्यपदक पटकावत भारताला टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलं होतं.

थोडक्यात बातम्या

‘शेतकऱ्यांची डोकी फोडून तुम्हाला जनआशीर्वाद मिळणार का?’; शिवसेनेचा संतप्त सवाल

अवनीची ऐतिहासिक कामिगरी! अवनी लेखराने पटकावलं सुवर्णपदक

अमेरिकेचा एअर स्ट्राईक! ड्रोन राॅकेटचा वापर करून आयसीसचा मोठा डाव उधळला

“मी तुमच्या सरकारला घाबरत नाही, सरकारनं शेतकऱ्यांची माफी मागावी”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More