लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना मोबाईलमधून फेसबुक इंस्टाग्रामसह 89 अॅप डिलीट करण्याचे आदेश
नवी दिल्ली | भारतीय जवानांना त्यांच्या मोबाईलमधून डेटिंग अॅप डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम तसंच ट्रूकॉलर या अॅप्सचा समावेश आहे. या अॅपसहहित आणखीही काही महत्त्वाच्या अॅप्सचा समावेश आहे.
भारतीय लष्कराची कुठलीही माहिती लीक होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने फेसबुक, टिकटॉक, युसीब्राऊझर आणि पबजी यांसारख्या प्रसिद्ध अॅप्सच्या वापरावर बंदी आणली आहे. त्याशिवाय टिंडर सारख्या डेटिंग अॅप्सलाही डिलीट करण्यास सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनदरम्यानच्या संघर्षानंतर भारताने चीनच्या 59 अॅपवर बंदी आणली होती. त्यानंतर आता भारतीय लष्कराने जवानांना आपल्या मोबाईलमधून डेटिंग अॅप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत, असं एएनआयच्या हवाल्याने कळतं आहे.
Indian Army has asked its personnel to delete 89 apps from their smartphones including Facebook, TikTok, Truecaller and Instagram to plug leakage of information: Indian Army Sources pic.twitter.com/l23Lu5ndNh
— ANI (@ANI) July 8, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
राज्यात आज 6555 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! प्रसूतीसाठी महिलेची २३ किलोमीटरची पायपीट… नदीनाल्यातून, घनदाट जंगलातून प्रवास
आतापर्यंत 25 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात…, अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण
Comments are closed.