Job Update l बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेद्वारे स्थानिक बँक अधिकाऱ्याच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत तब्ब्ल 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
या तारखेपर्यंत करा अर्ज :
इंडियन बँकेने जाहीर केलेल्या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी तुम्ही 2 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. मात्र जर काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवसांतील अडचणी टाळण्यासाठी नियोजित तारखेपूर्वी फॉर्म भरावा.
तसेच इच्छुक उमेदवार इंडियन बँकेच्या indianbank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत 1000 रुपये अर्ज शुल्क असणार आहे, तर SC/ST/PWBD उमेदवारांना शुल्क म्हणून 175 रुपये भरावे लागतील.
Job Update l अर्ज भरण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे 1 जुलै 2024 रोजी वयाची गणना केली जाणार आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वरच्या वयात सूट देण्यात येणार आहे.
– सर्वात प्रथम इंडियन बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी indianbank.in या अधिकृत वेबसाइट जा.
– त्यानंतर वेबसाइटवरील भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
– यानंतर तुम्हाला नवीन पोर्टलवर नवीन नोंदणीसाठी Click here वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
– नोंदणीनंतर, उमेदवारांनी इतर तपशील, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
– शेवटी, अर्ज शुल्क भरल्यानंतर पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.
News Title – Indian Bank Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“राजे माफ करा..”; शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखची पोस्ट
पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
दहीहंडीला मिळाली आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर
BCCI चं ऐतिहासिक पाऊल, क्रिकेटपटूंसाठी जय शाह यांची सर्वात मोठी घोषणा!
“आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा?”; मालवण घटनेने राज ठाकरेंचा संताप