Top News खेळ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हीच काय ती भारताची एकमेव अचिव्हमेंट!

सिडनी | भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक अत्यंत प्रेमळ प्रसंग पहायला मिळाला. भर मैदानात एका भारतीय युवकानं चक्क एका ऑस्ट्रेलियन तरुणीला लग्नाची मागणी घातली आणि तीने ती मान्यही केली.

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून पहिल्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आहे.

अशा परिस्थितीत भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर हे अनोखं दृश्य पहायला मिळालं. काही काळ कॅमेरेही या जोडप्यावर खिळले होते. प्रेक्षक तसेच खेळाडूंनी देखील या जोडप्याला टाळ्याच्या गजरात शुभेच्छ्या दिल्या.

आता या अनोख्या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हीच काय ती भारताची एकमेव अचिव्हमेंट अशा शब्दात चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

पाहा तो व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या-

कार्यकर्त्यांमध्ये जात नसते, ज्याला तिकीट पाहिजे असतं त्यांना जात आठवते- नितीन गडकरी

फडणवीसांना नावं ठेवली, आता सत्तेत आहात तर करुन दाखवा- उदयनराजे भोसले

ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 389 रन्सचा डोंगर, स्टिव्ह स्मिथचं सलग दुसरं शतक

राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू

“पोपट घेऊन चंद्रकांत पाटील यांनी चिठ्ठ्या काढल्या; मात्र चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खोटी ठरली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या