देश

‘ही’ भारतीय कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक

नवी दिल्ली | काही महिन्यांपासून टिकटॉकच्या खरेदीच प्रकरण चांगलंच गाजत आहे. मायक्रोसॉफ्ट टिकटॉकला खरेदी करण्याच्या तयारीत दिसत होते. पण त्यानंतर त्यात ट्विटरनेही रुची घेतली. आता त्या खरेदीच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज हे नवे नाव समाविष्ट झाले आहे.

भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यावर आता रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडान्स यांच्यात चर्चा सुरू आहे. TechCrunch च्या अहवालानुसार या दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूकीबाबत चर्चा चालू आहे. पण अजून या व्यवहाराबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

रिलायन्स, बाईटडान्स आणि टिकटॉक यांच्याकडून याबाबत काहीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारत सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चीनच्या ५९ अ‌ॅपवर बंदी घातली. मागच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WeChat आणि TikTok या दोन्ही कंपन्यांचे व्यवहार थांबवले.

चीनच्या बाहेर टिकटॉकचे भारत देश ही मोठी बाजारपेठ आहे. टिकटॉकला भारतात जवळ जवळ 200 दशलक्ष वापरकर्ते मिळाले होते.

महत्वाच्या बातम्या-

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधान मोदींकडून संकेत

“देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही….”; मुश्रीफांचा फडणवीसांना सणसणीत टोला

दिवंगत अभिनेता सुशांतला कॅलिफोर्नियाकडून मरणोत्तर पुरस्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या