नवी दिल्ली | आरक्षणाच्या विरोधात एकत्र आलेल्या आंदोलकांनी भारतीय संविधान जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आरक्षण रद्द करा, अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी होती. यावेळी आरक्षणविरोधात तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, आता या आंदोलनाचा व्हीडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी होतेय.
मनुस्मृति के बजाय संघी भाजपाई हमारे देश के संविधान को जला रहे है। @PMOIndia कुछ टिप्पण करेंगे इस मामले में ? या अपना चिरपरिचित मौन ही बनाए रखेंगे? जितना जितना फ़ासीवाद आगे बढ़ता जाएगा यह लोग बाबा साहब को और भी अपमानित करेंगे – यही इनका असली चरित्र है। मोदी जी कुछ तो शर्म करो।
— Jignesh Mevani (@jigneshmevani80) August 10, 2018