टीम इंडियाला नवीन हेड कोच मिळणार? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Team India Head Coach l भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) काही काळापासून पुरुष भारतीय क्रिकेट संघासाठी हेड कोचच्या शोधात आहे. मात्र आता कदाचित बोर्डाचा शोध संपला आहे आणि त्यांना भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या रूपाने योग्य उमेदवार सापडला असल्याची माहिती समोर आली आहे.

गौतम गंभीर काय निर्णय घेणार? :

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी गंभीर हा एकमेव उमेदवार आहे आणि त्याची मुलाखत आज होणार आहे. बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती गौतम गंभीरची झूम कॉलद्वारे मुलाखत घेणार आहे. या समितीत अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

2024 च्या आयपीएलमध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्ससाठी मेंटरची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत जर तो टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला तर त्याला केकेआरसोबतचा संबंध संपवावा लागेल. त्यामुळे आज भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी गौतम गंभीर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Team India Head Coach l T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे

सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. 2024 च्या T20 विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयने 13 मे रोजी मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज जारी केला होता, ज्याची शेवटची तारीख 27 मे होती. राहुल द्रविडने पुन्हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. तसेच गंभीरबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी त्याची पहिली पसंती होती.

उल्लेखनीय बाब म्हणजे, गंभीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 104 डावांमध्ये त्याने 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या ज्यात 9 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 143 डावांमध्ये त्याने 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या, ज्यात 11 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 च्या उर्वरित 36 डावांमध्ये त्याने 27.41 च्या सरासरीने आणि 119.02 च्या स्ट्राईक रेटने 932 धावा केल्या, ज्यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

News Title – Indian Cricket Team Head Coach

महत्त्वाच्या बातम्या

‘बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला…’, या खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

पोलीस भरती पुढे ढकला; ‘या’ नवनिर्वाचित खासदाराची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आज बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये

उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात; पाऊस आला तर काय होणार?

या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो