बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् सगळेच भारतीय खेळाडू बसले गुडघ्यावर! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

नवी दिल्ली | टी-20 विश्वचषक स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. त्यातच भारत विरूद्ध पाकिस्तान असा रंजक सामना काल क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाला. पाकिस्तानचा पराभव करून भारत पुन्हा मौका साधणार की यंदा पाकिस्तान बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण कालच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने भारताचा पराभव करत सामना खिशात घातला.

भारत विरूद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की, सर्वत्र या सामन्याचीच चर्चा असते. पण कालच्या सामन्यात एका वेगळ्याच गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. भारत-पाकिस्तान सामना रंगण्यापूर्वी भारतीय संघाचा एक ना एक खेळाडू गुडघ्यावर बसलेला पाहायला मिळाला. हा नेमका प्रकार काय आहे? याचीच सगळीकडे चर्चा होती.

पण भारतीय संघाने गुडघ्यावर बसून जगभर सुरू असलेल्या ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ या चळवळीला समर्थन देत आपला सहभाग नोंदवला आहे. सध्या जगभरातून कृष्णवर्णीयांच्या हत्येचा निषेध केला जात आहे. यासाठी लोक आपल्या गुडघ्यावर बसून या चळवळीत सहभाग नोंदवत आहेत. गुडघ्यावर बसण्याला अर्थात या ‘टेकिंग द नी’ला वर्णद्वेषाविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेचं प्रतिक असल्याचं म्हटलं जात आहे.

मागील वर्षी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर या चळवळीने जोर धरला. पाकिस्तानी खेळाडूंनी गुडघ्यावर न बसता ह्रदयाजवळ हात ठेवत ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीचे समर्थन केले. तर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने मात्र गुडघ्यावर बसून या चळवळीत सहभाग नोंदवला. भारतीय खेळाडूंच्या या कामामुळे सगळ्यांनाच त्यांचा अभिमान वाटत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

“ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, समझनेवालों को इशारा काफी होता है”

“आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि निवडणुकीत या मुद्द्याचा वापर करायचा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More