Top News खेळ

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा राज्यसभेतही बोलबाला!

नवी दिल्ली | नुकत्याच पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये भारत संघाने ऑस्ट्रलियावर मात करत विजय मिळवला. त्यामुळे सर्वत्र भारत संघाचे कौतुक होताना पहायला मिळत आहे. या कसोटीदरम्यान भारत संघाचे नेतृत्व करणारा आणि ताकदीने नेतृत्वपद सांभळणारा अजिंक्य रहाणेच नाव आजही सर्वांच्या तोंडी आहे. क्रिकेट इतिहासात निचांकी स्कोअरवर आऊट झाल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत टेस्ट मालिका जिंकत इतिहास घडवला. राज्यसभेतही भारतीय संघाचं कौतुक करण्यात आलं आहे.

अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघाचं राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील कौतुक केलं आहे. त्याचबरोबर याआधीही त्यांनी ट्विट करत कौतुक केलं होतं.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात भारत-ऑस्ट्रेलिया मालिकाचा उल्लेख करत भारतीय संघाचं कौतुक केलं. ‘मागचं वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच कठीण होतं. पण भारतीयांनी याचा सामना केला. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला. पण आम्ही चांगलं पुनरागमन केलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात शानदार यश मिळवलं. या विजयाने भारतीय लोकांच्या ताकदीची पुन्हा आठवण करून दिली, असं सीतारामन म्हणाल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘मन की बात’ मधुन भारतीय संघाचं कौतुक केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

‘मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला’; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

….तोपर्यंत आमीर खान मोबाईल ठेवणार बंद, आमिरने घेतला मोठा निर्णय!

“डॉ. तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला होता”

“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या