खेळ

भारतीय हॉकी संघातील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | कोरोनाने जगभरात तांडव घातलं आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच आता कोरोनाने खेळातही शिरकाव केला आहे. भारतीय हॉकी संघाचे मनदीप सिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

भारतीय खेळ प्राधिकरणाने सोमवारी ही माहिती दिली. 25 वर्षाचे मनदीप यांच्यात आजाराचे कोणते लक्षण दिसून आले नाही तसेच बंगळुरूमधील अन्य खेळाडूंचे उपचार चालू आहेत.

बंगळुरूच्या भारतीय खेळ प्राधिकरणात 20 ऑगस्टपासून राष्ट्रीय शिबीर चालू होणार आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाने सांगितलय,”भारतीय पुरुष हॉकी संघाचे सदस्य मनदीप सिंह आणि अन्य 20 खेळाडूंची कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण त्याचे काही लक्षण दिसत नाही.”

भारताचे कर्णधार मनप्रीत सिंह आणि अन्य चार खेळाडू एका महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय खेळ प्राधिकरणात परतले होते. पण मागच्या आठवड्यात त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली.

महत्वाच्या बातम्या-

पार्थ पवारांच्या राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण; “संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा”

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सहनूरने 30 हजार सॅनिटरी पॅडचं केलं वाटप

टिकटॉक खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट नाहीतर ‘ही’ मोठी कंपनी तयार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या