मुंबईच्या नागरिकाला पाकिस्तानात अटक, १४ दिवसांची कोठडी

मुंबईच्या नागरिकाला पाकिस्तानात अटक, १४ दिवसांची कोठडी

इस्लामाबाद | कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु असतानाच पाकिस्तानने आणखी एका भारतीय नागरिकाला अटक केलीय. शेख नबी असं या व्यक्तीचं नाव असून ते मुंबईचे रहिवासी आहेत. त्यांच्याजवळ परदेशी प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रं नसल्याचा आरोप आहे.

शेख नबी यांना इस्लामाबादमधून अटक करण्यात आलीय. त्यांना न्यायालयात नेल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. 

Google+ Linkedin