बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

भोपाळ | कोरोनाचं संकट डोक्यावर घोंगावत असतानाच आता त्यात आणखी एका जीवघेण्या आजाराची भर पडली आहे. ब्लॅक फंगसमुळं आता अधिकच चिंता वाढली आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर गुणकारी आणि सहजच उपलब्ध होईल, असा उपचार असल्याचा दावा केला आहे. या डॉक्टरनं 100 वर्षांपेक्षा जास्त जुना फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. भोपाळ, इंदोर आणि जबलपूरमध्ये हे रुग्ण सापडल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. हा आजार जीवघेणा असल्यानं त्यावर उपचारासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचदरम्यान, मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरनं या आजाराला रोखण्यासाठी स्वस्त आणि सोपा असा उपाय सांगितला आहे.

मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना या उपचाराद्वारे ब्लॅक फंगससारख्या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. ब्लॅक फंगसवर उपाय म्हणजे मिथलीन ब्लू. डॉ. पांडे यांच्या मते हे औषध अँटीफंगलचं काम करतं आणि अगदी सहजपणे उपलब्ध होतं. खाणीत काम करणाऱ्यांना किंवा गिर्यारोहकांना ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी हे औषध दिलं जातं. अगदी कमी मात्रेतही हे औषध ऑक्सिजनची पातळी वाढवतं. सोबतच अँटी फंगसचंही काम करतं. घरातील अ‌ॅक्वारियममधील माशांना फंगसपासून वाचवण्यासाठीही या औषधाचे ड्रॉप टाकले जातात.

दरम्यान, डॉ. पांडे यांनी सांगितलं की, ‘प्रयोगात हे औषध प्रभावी ठरलं आहे. आपल्या रुग्णालयासह 12 पेक्षा अधिक रुग्णालयांनी या औषधाचा प्रयोग सुरू केला आहे. ज्याचे परिणाम चांगले आले आहेत. या औषधाचे फक्त दोनच डोस पुरेसे आहेत. ज्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले. पण या औषधाचा वापर करताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांच्या शरीरात हे औषध पोहोचवणारी व्हेंटिलेटर ट्युब आणि ऑक्सिजन ट्युब वारंवार स्वच्छ करत राहायला हवी. यामळे फंगस निर्माण होत नाही आणि रुग्ण पूर्णपणे सुरक्षित राहतो.

थोडक्यात बातम्या

अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका, “केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा…”

धोका वाढला! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ, जाणुन घ्या आकडेवारी

लग्नानंतर पाचच तासात नवरीला मृत्यूनं गाठलं, नवरदेवानं दिला मुखाग्नी

“देशातील बहुतांश भागात सहा ते आठ आठवड्यांचा लॅाकडाऊन लावण्यात यावा”

“कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More