बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Job Updates l तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कित्येक तरुणांची नेव्हीमध्ये काम करण्याचे स्वप्न असते. मात्र आता हेच स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल (DAS), विशाखापट्टणम, संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत, 2025-26 साठी शिकाऊ प्रशिक्षणासाठी नेव्ही अप्रेंटिस भरती जाहीर झाली आहे.

या भरतीद्वारे विविध ट्रेडमध्ये एकूण 275 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मात्र यासाठी मान्यताप्राप्त संस्थांमधून ITI पूर्ण केलेला असावा. या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया सुरु करावी.

Job Updates l भरती संबंधित संपूर्ण माहिती :

विभागाचे नाव : भारतीय नौदल

पदाचे नाव : नेव्ही अप्रेंटिस भरती

एकूण पदे: 275

शैक्षणिक पात्रता : ITI पास

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय किमान 14 वर्षे ते 18 वर्ष असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट: अधिक माहितीसाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

News Title :Indian Navy Trade Apprentice Recruitment 2024

महत्वाच्या बातम्या –

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? दीपक केसरकरांनी तारीख सांगितली

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे? अशाप्रकारे करा नोंदणी

क्रिकेट विश्वात शोककळा पसरली, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू

उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…; शिंदेंसमोर दिल्लीत भाजपाने ठेवल्या ‘या’ 2 मोठ्या ऑफर्स?

‘ते’ वादग्रस्त प्रकरण भोवणार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ