भारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी

काटमांडू |पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 ला 1000, 500 रुपयाच्या नोटा भारतीय चलनातून बाद केल्या होत्या. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या भारतीय नोटांना नेपाळमध्ये बंदी जाहीर करण्यात आली आहे. 

नेपाळमध्ये भारतीय नव्या नोटा आता स्विकारल्या जाणार नाहीत. नेपाळमध्ये आता या नोटांचा वापर करणे किंवा या नोटांमार्फत काही खरेदी करणे सुध्दा बेकायदा ठरवण्यात आले आहे.

नेपाळचे सूचना मंत्री गोकुल प्रसाद बास्कोटा यांनी गुरूवारी या निर्णयाची घोषणा केली. नेपाळ सरकाने हे आदेश लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, भारतातील नव्या नोटांना नेपाळ सराकारने मान्यता दिली नव्हती. परंतु या निर्णायाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. पण आता नेपाळ सरकारने  भारतीय नोटांना बेकायदा घोषित केले आहे.   

महत्वाच्या बातम्या 

-जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

-राफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

-निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर आणि….

-राहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं- मा. गो. वैद्य

-मोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी