नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारवर टीका होत असतानाही सलग तेराव्या दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 13 पैसे तर डिझेल 16 पैशांनी महाग झालंय.
मुंबईमध्ये पेट्रोल 85 रुपये 78 पैशांनी तर डिझेल 73 रुपये 34 पैशांनी मिळत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 77 रुपये 96 पैसे आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर 87 रुपये 11 पैसे आणि डिझेल 74 रुपये 79 पैसे आहेत.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु या दरवाढीवर सरकारने नियंत्रण आणलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–…तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा उद्धव ठाकरेंवर कारवाई व्हावी!
-मुख्यमंत्री अडचणीत; उद्धव ठाकरेंनी भर सभेत ऐकवली धक्कादायक ऑडिओ क्लिप
-होय… आम्ही कुत्रे आहोत; हितेंद्र ठाकूरांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
-मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची बदनामी करणं महागात; एकाला अटक
-ठोकशाही मोडून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेसला विजयी करा- अशोक चव्हाण
Comments are closed.