नवी दिल्ली | जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये काही भारतीय प्रवासी अडकले आहे. या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणा, अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे.
राणमध्ये अडकलेल्या काही भारतीयांना नुकतंच सरकारने मायदेशात परत आणलं. मात्र सरकारने विमानांची उड्डाण रद्द केल्यामुळे ताश्कंद विमानतळावर काही भारतीय अडकल्याची यादी माझ्याकडे आली आहे. हे सर्व भारतीय सुरक्षित आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे त्यांना भीती वाटत आहे, असं पत्रात लिहिलं आहे.
लवकरात लवकर भारतीयांना मायदेशी परत आणा अशी माझी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती आहे, असं शरद पवारांनी पत्रात नमूद केलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक 9 आणि पुण्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
व्हा लखपती! कोरोनावर उपाय सुचवा आणि जिंका….; नरेंद्र मोदींचं ट्वीट
कोरोनापासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कवर शिवरायांचा फोटो; शिवप्रेमींकडून संताप
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर
“चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर तुम्हाला तुमची उंची दाखवावी लागेल”
Comments are closed.