Indian Post Office Recruitment 2025 | भारतीय टपाल विभागात (Indian Postal Department) नोकरीची (Indian Post Office Recruitment 2025 ) सुवर्णसंधी (Golden Opportunity)निर्माण झाली आहे. ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) पदासाठी २५,२०० जागांची भरती (Recruitment) केली जाणार आहे. तर यासाठी अर्ज कसा करायचा, फिस किती असेल ते जाणून घेऊयात. (Application Process)
तुम्ही जर सरकारी नोकरीची (Government Job) तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. तरुणांसाठी भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
भारतीय पोस्ट ऑफिसने (India Post Office) ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना (Notification) जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण २५,२०० पदांची भरती केली जाईल. या भरतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा (Written Exam) घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड (Selection) गुणवत्ता यादीच्या (Merit List) आधारे केली जाईल.
अर्ज प्रक्रिया (Application Process) आणि महत्त्वाची तारीख (Important Date)
या पदासाठी इच्छुक उमेदवार ३ मार्च २०२५ पासून indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) २८ मार्च २०२५ आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्जाची लिंक बंद होईल.
वयोमर्यादा (Age Limit) आणि शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीसाठी वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच सरकारी आरक्षण नियमांनुसार (Reservation Rules), अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत (Relaxation) दिली जाईल, ओबीसी (OBC) वर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सवलत आणि दिव्यांग (Disabled) उमेदवारांना १० वर्षांची सवलत मिळेल. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये (PDF Advertisement) लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज शुल्क (Application Fee) आणि वेतन (Salary)
या अर्जासाठी General/OBC/EWS उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. तर SC/ST/महिला/PwD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला १०,००० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल आणि अनुभवाच्या आधारे (Experience) वेतन वाढू शकते. अतिरिक्त भत्ते (Allowances) वेगळे दिले जातील.
अर्ज कसा करावा? (How to Apply for Indian Post ईलभरती २०२५)
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ मार्च २०२५ आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Incomplete) असल्यास अर्ज अपात्र (Disqualified) ठरविण्यात येईल.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. (Indian Post Office Recruitment 2025 )
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तसेच, लवकरच या भरतीची अधिकृत PDF जाहिरात प्रकाशित होईल.
Title : Indian Post Office Recruitment 2025