Indian Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. भरतोय रेल्वेकडून बंपर भरती केली जाणार आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्यातच तुम्ही उत्कृष्ट खेळाडू असाल तर, तुमची लॉटरी लागली (Indian Railway Bharti 2024) असंच समजा.
रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईकडून क्रीडा कोट्याअंतर्गत अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आजपासूनच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आज 22 जुलै 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. भरतीअंतर्गत जारी करण्यात आलेली पदं क आणि ड गटातील आहेत.
या भरती मोहिमेद्वारे एकूम 62 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी 21 पदं गट ‘क’ आणि 41 पदं गट ‘ड’ ची आहेत. स्तर 5/4 मध्ये 5 पदं आहेत, स्तर 3/2 मध्ये 16 पदं आहेत आणि स्तर 1 मध्ये 41 पदं आहेत.
व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, ऍथलीट्स, जर तुम्ही कोणताही खेळ खेळला असेल आणि पातळी गाठली असेल, तर तुम्ही या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असाल.त्यामुळे युवकांनी जराही वेळ वाया न घालवता लगेच अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
शैक्षणिक पात्रता काय असणार?
या भरतीअंतर्गत स्तर 5/4 साठी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. स्तर 3/2 साठी, बारावी पास किंवा ITI पास किंवा दहावी पास अधिक शिकाऊ उमेदवारांना अर्ज करता येईल. तसेच (Indian Railway Bharti 2024) दहावी पास उमेदवार लेव्हल 1 पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी वयाची अट ही 18 ते 25 वर्षे ठेवण्यात आली आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि शुल्क?
अर्ज करण्यासाठी प्रक्रिया आज 22 जुलै 2024 पासून सुरू झाली असून उमेदवार 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज भरू शकतात. एक महिन्याचा अवधी अर्ज भरण्यासाठी देण्यात (Indian Railway Bharti 2024) आला आहे. सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये तर, SC, ST, EWS, PH आणि महिला उमेदवारांना फी म्हणून 250 रुपये भरावे लागतील.
अर्ज कुठे करणार?
इच्छुक उमेदवार RRCCR च्या अधिकृत वेबसाइटवर rrccr.com वर जाऊन अर्ज भरू शकतात. या वेबसाइटवर तुम्हाला सर्व माहिती प्राप्त होईल.
निवड कशी होणार?
उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात केली जाईल. सर्वप्रथम (Indian Railway Bharti 2024) उमेदवारांना चाचणीसाठी बोलावलं जाईल. जे योग्य असतील तेच पुढील प्रक्रियेसाठी जातील. दुसऱ्या टप्प्यात खेळांचे कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रशिक्षकाचे निरीक्षण यांचा समावेश असेल. तर तिसरा टप्पा हा शैक्षणिक पात्रता असेल. पहिला टप्पा 50 गुणांचा, दुसरा 40 गुणांचा आणि तिसरा 10 गुणांचा असेल.
News Title – Indian Railway Bharti 2024
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीबाबत गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला…
सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या एकच महिन्यांनी दिली गुड न्यूज?, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल
अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालंय, त्यांनी..”; संजय राऊत यांची टीका
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस, NDRF ची टीम तैनात