Indian Railways l भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांसाठी नेहमीच तत्पर सेवा पुरवत असते. लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात आणि रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असतो की प्रवाशांना अधिकाधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास अनुभवता यावा. याच उद्देशाने, लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये काही विशेष नियम आणि सवलती (concessions) ठेवल्या आहेत. जर तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन रेल्वे प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी तिकीट नियम :
भारतीय रेल्वे (Indian Railway) लहान मुलांसाठी त्यांच्या वयानुसार तिकीट नियमांमध्ये सवलत देते. नियमांनुसार, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकासाठी कोणतेही तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. 1 ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी देखील रेल्वे तिकीट मोफत (free ticket) आहे, आणि त्यांच्यासाठी सीट आरक्षित करण्याची गरज नसते. या वयोगटातील मुले विनातिकीट आपल्या पालकांसोबत प्रवास करू शकतात, ज्यामुळे कुटुंबाचा प्रवासाचा खर्च काही प्रमाणात कमी होतो.
परंतु, 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी नियम थोडे वेगळे आहेत. या वयोगटातील मुलांसाठी रेल्वे प्रवासात अर्धे तिकीट (half ticket) घेणे अनिवार्य आहे. अर्धे तिकीट काढल्यावर, रेल्वे प्रशासनाकडून मुलांसाठी स्वतंत्र बर्थ (seat) किंवा सीटची व्यवस्था केली जात नाही. पालकांना आपल्या मुलांसोबत आपल्याच सीटवरAdjust करावं लागते. जर तुम्हाला 5 वर्षांखालील मुलांसाठी स्वतंत्र सीटची आवश्यकता असेल, अथवा 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी स्वतंत्र बर्थ हवा असेल, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण तिकीट (full ticket) खरेदी करावे लागेल. तुम्ही तिकीट बुकिंग करताना बर्थ निवडल्यास, पूर्ण भाडे आकारले जाईल हे लक्षात ठेवावे.
Indian Railways l शिशु बर्थ आणि आधुनिक सुविधा :
प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास अनुभवता यावा यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) नेहमीच नवनवीन सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ, दोन वर्षांपूर्वी, रेल्वेने ‘लखनऊ मेल’ (Lucknow Mail) गाडीच्या AC थर्ड क्लास बोगीमध्ये लहान मुलांसाठी ‘शिशु बर्थ’ (Shishu Birth) म्हणजेच खास बाळं आणि लहान मुलांसाठी विशेष सीटची सुविधा सुरू केली होती.
प्रवासाच्या वेळी लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना होणारा त्रास कमी व्हावा, हा या सुविधेमागचा उद्देश होता. त्यामुळे, रेल्वे प्रवासाच्या वेळी तिकीट बुक करण्यापूर्वी रेल्वेच्या वेबसाइटवरून किंवा अधिकृत स्रोतांकडून current updates and rules तपासून घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. हे नियम आणि सवलती लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील आणि त्यांचा रेल्वे प्रवास सुखकर होईल.