बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय रेल्वेने भंगार विकून कमावले कोट्यवधी रुपये; आकडा वाचून थक्क व्हाल

मुंबई | भारतीय रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तूंची विक्री करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. गेल्यावर्षी रेल्वेने भंगारात असलेल्या वस्तू विक्रीला काढत दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी 92.49 कोटी रुपयांचे उत्पादन मिळवले होते. मात्र, यावर्षी याच कालावधीत भंगारातील वस्तूंचे भारतीय रल्वेने 227.71 कोटी रुपयांचे उत्पादन मिळवल्याची माहिती उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आशुतोष गांगल यांनी दिली आहे.

रेल्वेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भंगाराचे विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. स्लीपर, रेल्वेच्या ट्रेकची तुकडे, रेल्वे लाईनजवळील टायबर यांमुळे रेल्वेला धोका होण्याची शक्यता असते. यामुळे त्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. तसेच रेल्वेचे केबिन, क्वार्टर, पाण्याच्या टाक्या अशा बेबंद संरचनांना मोडीत काढण्याला प्राधान्य दिले जाते .यातून भंगाराच्या कमाईसह परिसर स्वच्छ ठेवला जातो.

रेल्वेने 2021-22 या आर्थिकवर्षात भंगाराच्या कमाईतून 4 हजार 100  कोटी रुपयांचे उत्पादन घेण्याचे लक्ष ठेवले आहे. रेल्वेकडून सध्या अनेक ठिकाणी विद्युतीकरण करण्याचे काम चालू आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भंगार निघते .

गेल्या काही वर्षांपासून भंगार झालेल्या वस्तू अनेक ठिकाणी तशाच पडून राहिल्या होत्या. त्यामुळे रेल्वेला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत होते. मात्र रेल्वेने अलीकडील काळात अशा वस्तूंची भंगारात विक्री केल्याने अनेक जागा रिकाम्या होत आहेत. त्याचबरोबर परिसर स्वच्छ होत आहे.

थोडक्यात बातम्या –

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

IPL 2021: केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, अखेर पंजाब किंग्सने सामना 5 विकेट्सने खिशात घातला

…अन् भररस्त्यात महिलेचं मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळाला, पाहा व्हिडीओ

“राहुल गांधी न घाबरता सरकारला प्रश्न विचारतात, प्रामाणिक लोकच हे करु शकतात”

हार्दिक पांड्याची जागा ‘हा’ आयपीएल गाजवणारा खेळाडू घेऊ शकतो- सुनिल गावसकर

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More