Indian Railways | भारतीय रेल्वेने 15 फेब्रुवारी 2025 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष भाडे सवलत योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिला ज्येष्ठ नागरिकांना (58 वर्षे व त्याहून अधिक) 50% सवलत, तर पुरुष ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षे आणि त्याहून अधिक) 40% सवलत दिली जाणार आहे.
या योजनेचा उद्देश, निश्चित उत्पन्नावर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास खर्च सुलभ करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे ते आपल्या कुटुंबाला भेट देऊ शकतील, धार्मिक यात्रा करू शकतील किंवा आवश्यक कारणांसाठी देशभर प्रवास करू शकतील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता-
महिला प्रवाशांना किमान 58 वर्षे वय असावे. पुरुष प्रवाशांना किमान 60 वर्षे वय असावे. ही सवलत फक्त भारतीय (Indian Railways) नागरिकांसाठी लागू आहे. Tatkal तिकीटांवर ही सवलत लागू होणार नाही.
ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेसाठी:
IRCTC वेबसाइटवर लॉगिन करा.
प्रवासाचा तपशील भरा आणि ‘Senior Citizen Concession’ पर्याय निवडा.
वयाचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र) अपलोड करा.
पेमेंट करून तिकीट डाउनलोड करा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त सुविधा
कोणत्या सुविधा उपलब्ध?
जनरल डब्यांमध्ये प्राधान्याने बसण्याची जागा
मोठ्या स्टेशनवर व्हीलचेअरची सुविधा (अनुरोध केल्यास उपलब्ध)
तिकीट खरेदी आणि चेक-इनसाठी स्वतंत्र रांगा
स्लीपर आणि एसी डब्यांमध्ये खालच्या बर्थला प्राधान्य
योजनेचे महत्त्व आणि भविष्यातील सुधारणा-
ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास खर्चात मोठी बचत करण्यास मदत करेल. यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटायला, धार्मिक यात्रांसाठी (Indian Railways) प्रवास करायला आणि सामाजिक संवाद वाढवायला प्रोत्साहन मिळेल. वंदे भारत (Vande Bharat) आणि तेजस (Tejas) सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये सवलतीचा विस्तार. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबे उपलब्ध करणे. कमी खर्चात अतिरिक्त ट्रॅव्हल इन्शुरन्स सुविधा