खेळ

दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; शुभमन गिलला संधी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या काही मालिकांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला आफ्रिकेविरुद्ध मालिकेत डच्चू देण्यात आला आहे.

राहुलच्या जागी भारत ‘अ’ संघाकडून विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रोहित शर्मालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. राहुलच्या जागी रोहितचा सलामीवीर म्हणून विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य प्रसाद यांनी केलं होतं.

आफ्रिकेविरुद्ध मालिकेत रोहितला सलामीवीर म्हणून संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या