भारताच्या रणरागिणी प्राणपणाने लढल्या; मात्र विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं!

भारताच्या रणरागिणी प्राणपणाने लढल्या; मात्र विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं!

अँटिगा | भारतीय महिला क्रिकेट संघाचं टी-20 विश्वचषकातलं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. इंग्लंडनं एकतर्फी वर्चस्व ठेवत भारताचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. त्यामुळे भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.

भारताने प्रथम फलंदाची करत फक्त 113 धावांचं लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या अॅमी जोन्स आणि नताली सिवरने 92 धावांची भागीदारी करत सहज लक्ष्य गाठलं.

त्याआधी, भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 34 धावा काढल्या. जेमिमा रोड्रिग्स 26 आणि हरमनप्रीतने 16 धावा करत खेळ सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. 

दरम्यान, टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या संघांमध्ये होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अतिउत्साहात केलेलं वक्तव्य भाजप नेत्याच्या अंगलट; घेतली जाहीर माघार

-SRPF भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; माजी अप्पर पोलिस अधीक्षकाला अटक

-आंदोलन करणाऱ्या तुकाराम मुंढेंच्या 17 समर्थकांना अटक

-एकाही मराठा आमदारांना सोडणार नाही; मराठा मोर्चेकऱ्यांचा इशारा!

-बदली झाल्यानंतर तुकाराम मुढेंचीं पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले?

Google+ Linkedin