सिडनी | भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आज सिडनीच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता.
पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नसल्याने सरस धावगतीच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. यापूर्वी झालेल्या सात ट्वेन्टी-20 विश्वषचक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नव्हती.
विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात असलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत आपल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली होती. साखळी फेरीत भारताने 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले होते. तर इंग्लंडने 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं.
दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय संघ इतिहास बदलणार का?, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र पावसामुळे इंग्लंडच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.
The #INDvENG semifinal is called off due to rain. #TeamIndia 🇮🇳🇮🇳 make it to their maiden #T20WorldCup final. pic.twitter.com/y4rfDWjzFi
— BCCI Women (@BCCIWomen) March 5, 2020
ट्रेंडिंग बातम्या-मराठवाडा पाणीप्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
इटलीहून परतल्यानंतर राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?; भाजपची टीका
महत्वाच्या बातम्या-
हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रितेशचा टिक टाॅक व्हिडीओ पाहिलात का?
कोरोनापासून वाचण्यासाठी भारतीयांची ‘ती’ पद्धत वापरा; इस्राईलच्या पंतप्रधानांचा सल्ला
Comments are closed.