बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

टोकियो | नुकतचं भारतीय पुरूष हाॅकी संघाने इतिहास रचला आहे. भारतीय पुरूष हाॅकी संघाने तब्बल 49 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने ब्रिटनच्या संघाचा दारूण पराभव केला. त्यानंतर भारतीयांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.

भारतीय हाॅकी महिला संघाने देखील बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियासोबत भारताचा सामना खेळला गेला. या सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल अशी सर्वांनाच आशा होती. पण भारतीय संघाने जोरदार पलटवार करत सामना 0-1 अशा फरकाने हा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

सुरूवातीपासून भारतीय संघाने आक्रमक खेळी केली. 22 व्या मिनिटाला गुरजीत कौरने आक्रमक गोल दागला. त्यामुळे पहिल्या सत्रात भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. पुर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाला 7 पेनल्टी काॅर्नर मिळाले. या 7 सुवर्णसंधीचा त्यांना फायदा उचलता आला नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये प्रथमच भारतीय महिला हाॅकी संघ पोहोचला आहे. त्यांचा पुढील सामना अर्जेन्टिनाशी होणार आहे. त्यामुळे आता महिला हाॅकी संघाकडून भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

चक दे इंडिया ! भारतीय पुरूष हाॅकी संघाने रचला इतिहास; 49 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक

शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार आलुरे गुरूजी यांचं निधन!

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More