“हे जय शहा… BCCI सोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंंटवरुन ट्विट करु नका”
देश | गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन चालू आहे. यावर 3 फेब्रुवारीला भारतीय क्रिकेटमधील प्रमुख खेळाडूंनी ट्विट करत शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. गेले 60-70 आंदोलन चालू असताना कोणीही काही शब्द काढला नाही.
अचानक सर्वांनी सोशल मीडियाद्वारे आपलं मत माडंलं. याच पार्श्वभूमीवर भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर टीका केली आहे.
कृपया बीसीसीआयसोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंटवरुन ट्विट करु नका. गृहमंत्री अमित शाह यांना शेतकऱ्यांची लवकर भेट घ्यायला सांगा आणि काळा कायदा रद्द करायला सांगा, असं श्रीनिवास बीवी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रिय बीसीसीआय, कृपया आपल्या क्रिकेटपटूंना बळजबरीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावू नका…हे खूप बालिश दिसतं, असंही श्रीनिवास बीवी म्हणाले.
Hey @JayShah,
Please stop tweeting from twitter accounts of cricketers contracted with BCCI.
And also ask Amit shah ji to meet farmers and repeal black laws as earliest.
Thanks. pic.twitter.com/enSW8N06tT
— Srinivas B V (@srinivasiyc) February 3, 2021
थोडक्यात बातम्या-
जनतेला सर्वात मोठा धक्का; LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर
“देशाच्या एकतेला प्राधान्य राहिल अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी”
शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवार म्हणाले…
आदित्य ठाकरेंनी उडवली मनसेची खिल्ली, म्हणाले…
ठाकरे सरकारने पंकजा मुंडेंचं ‘ते’ धोरण ठेवलं कायम
Comments are closed.