बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिमान बाळगण्यापेक्षा सिंधूची जात शोधण्यात भारतीय व्यस्त; ‘हे’ राज्य आघाडीवर!

मुंबई | भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत चीनच्या बिंग जिआओवर दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पी. व्ही. सिंधूने सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धेत पदके प्राप्त केली आहेत. याचा अभिमान बाळगण्यापेक्षा भारतीयांनी तिची जात कोणती हे पाहणं पसंत केलं आहे.

पी. व्ही. सिंधूची जात जाणून घेण्यात आंध्र प्रदेश आणि झारखंडमधील लोकांनां विशेष रस असल्याचे गुगल ट्रेंड्सचे आकडे सांगतात. पी.व्ही. सिंधूच्या जातीचा शोध घेण्यात आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर, झारखंड दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणा तिसऱ्या क्रमांकावर, उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आणि बिहार पाचव्या क्रमांकावर आहे.

1 ऑगस्टला पी.व्ही. सिंधू कास्ट सर्च मध्ये तब्बल 700 टक्के वाढ झाली आहे. एकीकडे खेळाडू प्रयत्नांची पराकाष्टा करत पदकाला गवसणी घालतात आणि देशाचं नाव उंचावतात. त्यामुळे अशा खेळाडूंचा आपल्याला अभिमान वाटायला हवा मात्र लोक त्या खेळाडूंची जात शोधण्यात मग्न झाले आहेत.

दरम्यान, पी. व्ही. सिंधूने मिळवलेल्या विजयामुळे ती ऑलिम्पिक स्पर्धेत सलग 2 पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला तर दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे.  चीनच्या खेळाडूला चारी मुंड्या चीत करून सिंधूने विजय मिळवल्याने तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“राज्यपालांच्या दौऱ्यावर बोलण्यापेक्षा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याचा आढावा घ्या”

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव

शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More