“भारतीयांनी तात्काळ कीव सोडावं”; भारतीय दूतवासानं दिल्या महत्त्वाच्या सूचना
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे सावट पसरलं आहे. अशातच आता युक्रेनची राजधानी कीववर रशिया आक्रमण करणार आहे. त्यामुळे कीवमधील अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो उपलब्ध गाड्यांद्वारे किंवा उपलब्ध इतर कोणत्याही माध्यमांद्वारे तातडीने कीव सोडण्याच्या सूचना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने दिल्या आहेत.
रशियाचा सगळ्यात मोठा लष्करी ताफा कीवच्या दिशेनं निघाला आहे. 64 किलोमीटर इतक्या लांबीचा लष्करी ताफा कीवकडे चाल करत आहे. त्यामुळे भारतीयांनी तात्काळ कीव सोडावं, अशा सूचना भारतीय दूतवासानं दिल्या आहेत.
रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 16 मुलांसह 352 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. या युद्धात रशियन सैनिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
थोडक्यात बातम्या –
“सत्ता जाण्याच्या भीतीनं उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर कारवाई करत नाही”
“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”
धक्कादायक! दोन वेळच्या अन्नासाठी ‘या’ ठिकाणी मुलं आणि किडनी विकण्याची वेळ
युक्रेनच्या रस्त्यावर महाकाय रशियन फौज, धक्कादायक फोटो समोर
Petrol Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर
Comments are closed.