बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुलचा शतकी तडाखा, भारताचं इंग्लंडला 337 धावांचं आव्हान

पुणे | तीन सामन्यांच्या मालिकेतील दिसरा एकदिवसीय सामना चालू आहे. दुसऱ्या सामन्यात पाहुणा संघ इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातील त्यांचा हा निर्णय त्यांच्या फायद्याचा ठरला असं वाटत होतं. भारताचे दोन्ही सलामीवर स्वस्तात परतले. मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि के. एल. राहुलने केलेली महत्त्वपुर्ण भागीदारीमुळे भारताची गाडी पुन्हा रूळावर आली.

विराट कोहलीनं राहुल सोबत शतकी भागीदारी करत डाव सावरला. कोहली 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंतने आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि धावांची गती वाढवली. अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्यानं सात षटकार आणि तीन चौकारांसह आपली खेळी साकारली. तर पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या राहुलने शतकी खेळी केली. 114 चेंडूत 108 धावा केल्या. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार लगावले.

अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही छोटेखानी आक्रमक खेळी केली.  चार षटकारांसह 16 चेंडूत 35 धावा ठोकल्या तर त्याचा बंधू क्रुणाल पांड्यानंही 12 धावांचं योगदान दिलं.

दरम्यान, इंग्लंड संघाला विजयासाठी मोठ्या खेळी करण्याची गरज आहे. सध्या इंग्लंड संघाने फलंदाजीला सुरूवात केली असून 40 धावा केल्या असून एकही गडी गमावलेला नाही.

थोडक्यात बातम्या- 

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आदळला पक्षी, पाहा व्हिडीओ

पुण्याच्या आयुक्त असताना ‘त्या’ खंडणी गोळा करत असायच्या; रश्मी शुक्लांवर ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप

भाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत- मनीषा कायंदे

10वी आणि 12 वीच्या परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More