बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिलांचा निर्णय, मुलाची कमाल; 12 वर्षीय अभिमन्युनं मोडला तब्बल 19 वर्षांचा रेकाॅर्ड

नवी दिल्ली |  मूळ भारतीय असणारा अभिमन्यु मिश्रा सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. बुडापेस्ट येथे आयोजित ग्रँडमास्टर टूर्नामेंटमध्ये अभिमन्यु मिश्राने बुद्धीबळ खेळाच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा खिताब पटकावला आहे. त्याने रशियाच्या सर्जी कर्जाकिन याच्या नावावर असणारा रेकाॅर्ड मोडत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल 19 वर्षांनी हा रेकाॅर्ड मोडला गेला आहे.

बुडापेस्ट येथे आयोजित ग्रँडमास्टर टूर्नामेंटमध्ये ग्रँडमास्टर लियाँन मेनडोंका याला पराभूत करत हे यश मिळवले आहे. हा रेकॉर्ड नावावर कताना अभिमन्यूचे वय 12 वर्षे 4 महिने आणि 25 दिवस इतके होते. तर यापुर्वी रशियाच्या सर्जीने रेकॉर्ड केला असताना ऑगस्ट, 2002 मध्ये सर्जीचे वय 12 वर्षे 7 महिने होते. त्यानंतर 19 वर्षांनी 3 महिन्यांच्या फरकाने अभिमन्यूने हा रेकॉर्ड तोडला आहे.

अभिमन्युचे वडिल अमेरिकेतील न्यु जर्सीमध्ये कामाला होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलानं बुद्धीबळ खेळात सर्वात कमी वयात ग्रँडमास्टर व्हावं, हे स्वप्न पाहिलं. त्यानंतर त्यांनी मुलाला लहानपणापासूनच खेळ शिकवला. या स्पर्धेसाठी एप्रिलमध्येच बुडापेस्टमध्ये आले होते. या स्पर्धेसाठी अभिमन्युने देखील फार मेहनत घेतली. आज हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळं आम्ही खूप आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया अभिमन्युच्या आई वडिलांनी दिली आहे.

दरम्यान, लियॉनच्या विरोधातील हा सामना अत्यंत कठीण होता. शेवटच्या वेळेत लियॉनने केलेल्या चूकीचा मला फायदा झाला आणि मी त्याला पराभूत करु शकलो. या विजयासोबत सर्वात लहान ग्रँडमास्टर बनल्यामुळे मी खूप आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया अभिमन्युने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्या परिवारातील सर्वजण आनंदात आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली; देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?

“सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीवर निवडणुका हा खात्रीशील इलाज नाही”

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ; ईडीनं बजावला नव्यानं समन्स

वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे घालून दिला नवा आदर्श; आईची अस्थी शेतात पसरवली

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More